लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक : शहरात करोनाचा आलेख खाली येत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही हळूहळू कमी होत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत शहरात करोनाचे ६२ हजार ५९५ हून अधिक रुग्ण सापडले. संबंधितांच्या निवासस्थानाचा परिसर १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आला. आजवर अशी तब्बल १४ हजार ८१८ क्षेत्र प्रतिबंधित झाली. त्यातील १४ हजार १८६ क्षेत्र विहित कालमर्यादा संपुष्टात आल्यानंतर प्रतिबंधातून मुक्त झाली आहेत. यात सर्वाधिक आठ हजार इमारती असून साडेपाच हजार बंगले आणि स्वतंत्र घरांची संख्या आहे. वाडा, झोपडपट्टी, चाळ, मळा असे भागही प्रतिबंधातून मुक्त झाले आहेत.

सध्या शहरात ६३३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

सहा एप्रिल रोजी शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. प्रारंभी दाट लोकवस्ती, झोपडपट्टी परिसरात शिरकाव करणाऱ्या करोनाने नंतर बंगले, इमारती अशा कॉलनी परिसरात बराच काळ ठिय्या दिला होता. एकूण बाधितांपैकी आतापर्यंत ५९ हजार ४८७ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. तर ८७० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २२३८ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण सापडल्यानंतर संबंधिताच्या निवासस्थानाचा परिसर सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रतिबंधित केला जातो.

सुरुवातीला विस्तीर्ण असणारे हे क्षेत्र नंतर रुग्णाच्या घरापुरतेच मर्यादित केले गेले. १४ दिवसांच्या काळात त्या त्या परिसरातील घरांमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविली गेली. प्रतिबंधामुळे इमारती आणि त्या परिसरातून बाहेर ये-जा करणेही स्थानिकांना अवघड झाले होते. हळूहळू बहुतांश भाग करोनाच्या विळख्यात सापडले. इमारत वा घराच्या परिसरात बाधित रुग्ण सापडल्यानंतर घराबाहेर पडण्यास धास्तावणारे नंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन दिनक्रम सुरू ठेवू लागले. मागील दोन, तीन महिने करोनाचा कहर अनुभवणाऱ्या नाशिकमध्ये ऑक्टोबरमध्ये स्थिती काहिशी आटोक्यात आल्याचे चित्र आहे. दररोज एक ते दीड हजाराच्या संख्येने आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या २०० पर्यंत खाली आली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण काहिसा कमी झाला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त झालेल्या क्षेत्रात ७९२२ इमारती, ५४९९  बंगले / स्वतंत्र घरे, १५१ वाडे, ९९ झोपडपट्टी, ३४० चाळ, १७५ मळ्यातील घरे परिसराचा समावेश आहे. यात नवीन नाशिक विभागात २७७४, पंचवटी २७६७, सातपूर २३२१, नाशिकरोड २६७८, नाशिक पूर्व १९४७ आणि नाशिक पश्चिम विभागातील १६९९ क्षेत्रांचा समावेश आहे. आज ही क्षेत्र प्रतिबंधातून मुक्त झाली असली तरी करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सणोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, करोनासंबंधीच्या नियमांचे पालन करणे, गर्दीत जाणे टाळणे आदी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

झोपडपट्टय़ांमधून करोना जवळपास हद्दपार ?

सध्या शहरात ६३३ प्रतिबंधित क्षेत्र असून त्यात देखील इमारती, बंगले, स्वतंत्र घरांची संख्या अधिक आहे. झोपडपट्टी परिसरातून करोना जवळपास हद्दपार झाल्याचे महापालिकेच्या अहवालावरून दिसते. सध्या झोपडपट्टी परिसरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहेत. वाडय़ातील सहा घरे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. ३२९ इमारती आणि २६२ बंगले/स्वतंत्र घरे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत.