महापौर अशोक मुर्तडक यांची ग्वाही
शहर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, तसेच परवानगी मिळविताना होणारी धावपळ टाळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना राबविण्यात येईल, असे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.
महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पालिकेत झाली.
यावेळी महापौरांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेला अनुसरून केलेल्या सूचनांप्रश्नी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे नमूद केले. मनपाकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या मंडळाच्या अखत्यारीत असणाऱ्या विभागीय कार्यालयात एकाच ठिकाणी देण्याच्या दृष्टीने एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध
सूचना केल्या.
त्यामध्ये मंडपासाठी आकारण्यात येणारा कर घेऊ नये, पर्वणी व गणेशोत्सव काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मिरवणूक मार्गातील अडथळे काढावेत, मिरवणूक मार्गावरील धोकेदायक विद्युत खांब काढावेत, वीजपुरवठा खंडित करू नये, गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळे पंचवटीपर्यंत येण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, दुष्काळग्रस्तांना मदत करावी, प्रत्येक मंडळाजवळ निर्माल्य कलश ठेवावेत, दीड दिवसाच्या विसर्जनाची व्यवस्था करावी, मूर्ती दानासाठी गणेशभक्तांकडे आग्रह करू नये, स्वेच्छेने मूर्ती दान केल्यास त्याचा स्वीकार करावा, मिरवणूक मार्गातील महत्त्वाच्या चार चौकांत रुग्णवाहिका ठेवाव्यात, गोदावरीची स्वच्छता कायम राहण्यासाठी प्रयत्न, मंडळांचे फलक काढू नयेत, पोलिसांकडून मिळणाऱ्या परवानग्या त्वरित मिळाव्यात, वीज मंडळाकडून आकारण्यात येणारी
अनामत परत मिळण्याची व्यवस्था करावी, अशा विविध सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, आ. सीमा हिरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा