विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जवळपास तीन वर्षांनंतर शहरात रणजी सामना होत असल्याने त्याचा आनंद घेण्यासाठी पहिल्याच दिवशी नाशिकच नव्हे, तर मालेगाव, जळगाव येथूनही क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कोणाला जयदेव उनाडकट, तर कोणाला केदार जाधवचे आकर्षण होते. सत्यजित बच्छाव घरचाच खेळाडू. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचा खेळ बघण्यासाठी तसेच क्रिकेट खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारी महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी बोचरा वारा, वातावरणात भारलेला गारवा आणि सामना बघण्यास उत्साहाने आलेले प्रेक्षक यामुळे क्रिकेटपटूंचा उत्साह वाढला. सामना सर्वाना पाहता यावा म्हणून नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने शहरवासीयांना मोफत प्रवेश दिला असून सात हजार क्रिकेटप्रेमी सामन्याचा आनंद घेऊ शकतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी आमदार सीमा हिरे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत सामन्याला सुरुवात झाली. जयदेव उनाडकट, हार्विक देसाई, अंकित बावणे, केदार जाधव, राहुल त्रिपाठी, सत्यजित बच्छाव या खेळाडूंविषयी अनेकांना उत्सुकता होती. क्रिकेट प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थीही बारकाईने सामना पाहात होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा सुरू असूनही वेळात वेळ काढून सामन्याचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले. खेळाडूंच्या लक्षवेधी कामगिरीला टाळ्यांच्या कडकडाटात, जल्लोषात प्रतिसाद दिला जात होता.

क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा असून शहरात सुरू असणारे रणजी सामने अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. म्हणून मालेगावहून सकाळीच नाशिकला आलो. कोणता खेळाडू कसा खेळतो, कुठे चुकतो हे प्रत्यक्ष पाहून खूप शिकायला मिळते आणि त्या गोष्टी मला आपल्या खेळात अजमावता येतील. केदार जाधवप्रमाणे मलाही पुढे रणजी सामन्यात खेळायला आवडेल.

– मंदार पाटील

क्रिकेट हा आवडता खेळ आहे. यामुळे शाळा सुटल्यानंतर लगेच सामना बघण्यास आलो. मी महाराष्ट्राचा असलो तरी जयदेव उनाडकट विशेष आवडतो. त्याचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून आलो असून रणजीमधून पुढे भारतीय क्रिकेट संघात त्याला बघायला मला आवडेल.

– पराग गायकवाड

आमची शैक्षणिक सहल नाशिकमधील तारांगणला भेट द्यायला आली आहे. समोरील मैदानावर रणजी सामना सुरू असल्याचे समजल्यानंतर आम्ही तो पाहण्यास आलो. यामुळे मुलांना ज्ञानासोबत आवडीचा खेळ, खेळाडू प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान मिळाले.

– रामचंद्र भावसार (सामरोद, जळगाव)