लोकसत्ता प्रतिनिधी 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: भडगाव येथील वडधे गावानजीकच्या गिरणा नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करीत चोरटी वाहतूक करीत असताना चार ट्रॅक्टर, दोन जेसीबी आणि डंपर असा सुमारे ६३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चाळीसगाव उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना वडधे गावानजीक गिरणा नदीपात्रात काही जण बेकायदेशीररित्या जेसीबीच्या सहाय्याने वाळूची ट्रॅक्टरसह डंपरमधून चोरी करीत वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्याअनुषंगाने पोलीस पथक थेट नदीपात्रात उतरले. त्यांना नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने काही जण ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना आढळून आले.

हेही वाचा… जळगाव: घरपट्टीची देयके, मनपासमोर रहिवाशांचा ठिय्या

तसेच वाळूने भरलेले चार ट्रॅक्टर, दोन जेसीबी, डंपर मिळून आले. यासंदर्भात परमेश्वर राजपूत, प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, राहुल महाजन यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी लखीचंद पाटील यांच्या सांगण्यावरून वाळूचोरी करीत आहोत, असे सांगितले. त्यांना वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव येथील पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध वाळूचोरीविरोधात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against five persons for illegal sand mining and smuggling in bhadgaon jalgaon dvr