लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : विधानसभा निवडणुकीत निवडणूक खर्च सादर न केल्याच्या कारणावरून नाशिक पूर्व मतदार संघातील मनसेच्या उमेदवाराने आपल्याच पक्षाच्या जिल्हा सचिवाच्या घरातून नऊ लाखांहून अधिक रुपये दमदाटी करुन नेले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मनसेचे उमेदवार प्रसाद सानप आणि त्यांच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

मनसेचे जिल्हा सचिव योगेश पाटील यांनी आडगाव पोलीस ठाण्यात सानपविरूध्द तक्रार दाखल केली आहे. प्रसाद सानप हे नाशिक पूर्व मतदार संघात मनसेचे उमेदवार आहेत. सानप यांनी पाटील यांच्यावर महानगरपालिका आणि निवडणूक आयोगाच्या परवानग्यांसंदर्भात जबाबदारी सोपवली होती. या कामाचा मोबदला म्हणून पाटील यांना काही रक्कम दिली होती. सानप यांनी पाटील यांना, मोबदला म्हणून दिलेल्या रकमेचा वापर महापालिकेडून मिळविण्यात येणाऱ्या परवानग्यांसाठी वापर करण्याची सूचना केली होती. पाटील यांनी मोबदला म्हणून मिळालेल्या रकमेचा उपयोग त्यासाठी करण्यास नकार दिला.

आणखी वाचा-नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई

आपणास तुमचे काम करता येणार नाही. तुमचे पैसे परत देतो, असे त्यांनी सांगितले. निवडणुक खर्च सादर करण्यासाठीही ते गेले नाहीत. याचा राग आल्याने सानप आणि त्यांचे साथीदार उमाकांत एगडे, नितीन घुगे, संकेत मोहिते हे पाटील यांच्या घरी गेले. निवडणुकीचा खर्च का सादर केला नाही, असा प्रश्न करीत पैसे परत करण्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी पाटील हे आतील खोलीत गेले असता संशयितांनी त्यांच्या पाठोपाठ जात आठ लाख ८४ हजार रुपयांची रोकड आणि पाटील यांच्या आईची ७५ हजार रुपयांची सोन्याची पोत असा नऊ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेला. घरातील आधार कार्ड, पॅनकार्ड, डेबिट कार्डही घेऊन गेले. याप्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.