नाशिक – शहरात मागील सात वर्षांत खून, वाहनांची जाळपोळ, तोडफोडीसह दाखल वेगवेगळ्या एकूण गुन्ह्यांची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेत कमी झाले असून दुसरीकडे दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या वर्षात आतापर्यंत एकूण २७१३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील १५६९ म्हणजे जवळपास ६० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले. यामध्ये खूनाच्या २७ पैकी २६ आणि वाहनांची जाळपोळ, तोडफोडीच्या १५ पैकी १४ गुन्ह्यांचाही समावेश आहे. चालू वर्षात पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईवर भर दिल्याने आतापर्यंत चौघांवर मोक्का, नऊजणांवर एमपीडीएची कारवाई झाली. तब्बल १२ हजार ७७४ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

एक ते दीड महिन्यातील घटनांमुळे वाढत्या गुन्हेगारीची चर्चा होत असली तरी गेल्या सात वर्षांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची सविस्तर आकडेवारी मांडून शहर पोलिसांनी हे प्रमाण तुलनेत घटल्याचे दर्शविले आहे. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कार्यभार स्वीकारताच उपाय योजनांना सुरुवात केली. अवैध व्यवसायाला लगाम घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, दरोडा व शस्त्र विरोधी पथके तयार करून कारवाई सुरू झाली. सामान्य नागरिकांच्या लहानसहान तक्रारींची दखल घेऊन गुन्हे दाखल करणे पोलीस ठाण्यांना बंधनकारक केले. गुन्हे दाखल न करता आकडेवारी कमी राखण्याचा कुठेही प्रयत्न होणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे किरकोळ तक्रारींवरूनही सध्या गुन्हे दाखल होत आहेत. २०२३ या वर्षात आतापर्यंत शहरात खुनाच्या २७ घटना घडल्या. यातील २६ गुन्ह्यांची उकल करीत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ वर्षांत खूनाचे ३० तर २०२१ मध्ये २९ गुन्हे दाखल झाले होते. वाहनांची जाळपोळ व तोडफोडीचे चालू वर्षात १५ गुन्हे दाखल झाले. यातील १४ गुन्ह्यांतील आरोपींवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये या प्रकारचे १५ आणि २०२१ या वर्षात १९ गुन्हे घडले होते. २०१७ ते २०२३ या वर्षातील आकडेवारी पाहता खून, वाहनांची जाळपोळ व तोडफोडीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हेही वाचा – नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासन; व्यापाऱ्यांचे भले होत असल्याची तक्रार

शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चालू वर्षात सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या काळात गुन्हेगारांवर अधिक्याने कारवाई होत आहे. या वर्षी आतापर्यंत चार गुन्हेगारांवर मोक्का (गतवर्षी – एक), एमपीडीए नऊ (गतवर्षी दोन) अशी ठोस प्रतिबंधक कारवाई झाली. अनेक भागांत टवाळखोरांचा उपद्रव जाणवतो. त्यामुळे पोलिसांनी आत्तापर्यंत १२ हजार ७७४ (गेल्या वर्षी १०,८४१) टवाळखोरांवर कारवाई केली.

वर्षनिहाय गुन्हे, उकल आकडेवारी

मागील सात वर्षांतील आकडेवारीचा विचार करता या वर्षी गुन्ह्यांची संख्या घटली असून जे गुन्हे दाखल होत आहेत, त्यांची उकल करण्याचे प्रमाणही वाढल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या काळात शहरात एकूण २७१३ गुन्हे दाखल झाले. त्यातील १५६९ गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगारांवर कारवाई झाली.

हेही वाचा – नाशिकमध्ये मित्रांकडून युवकाची हत्या, अपघाताचा बनाव करणारे दोन संशयित ताब्यात

२०२२ वर्षात ३४०५ गुन्हे दाखल होऊन २००२ गुन्ह्यांची उकल झाली होती. २०२१ वर्षात दाखल गुन्हे २८४४ (उकल १८४१), २०२० मध्ये दाखल गुन्हे ३२३५ (उकल २१०७), २०१९ वर्षात दाखल गुन्हे ४०६१ (उकल २६३१), २०१८ वर्षात एकूण ३७३५ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २२०९ गुन्ह्यांची उकल करणे यंत्रणेला शक्य झाले. अपहृत व हरविलेल्या मुला-मुलींचा चालू वर्षात नियमित आढावा घेऊन एकूण १७४ मुला-मुलींसह हरविलेल्या ७२६ व्यक्तींचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.