शहरात दोन दिवसांत चोरीच्या घटनेसह झालेल्या घरफोडीच्या घटनेत दीड लाखांहून अधिकचा ऐवज लंपास झाला.
सिन्नर फाटा येथील खर्जुलनगर येथे राहणाऱ्या स्नेहल गोरडिया या दुचाकीवरून घराकडे निघाल्या होत्या. नाशिक-पुणे रोडवरील नेहरूनगर येथे आल्या असता त्यांना कोणाचा तरी भ्रमणध्वनी आला. गांधी थांबवून त्या रस्त्याच्या कडेला उभ्या असतांना चोरटय़ाने त्यांची नजर चुकवून दुचाकीला लावलेली पर्स पळविली. पर्समध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी, घडय़ाळ, एटीएम व पासपोर्ट असा एकूण ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल होता.
दुसरी घटना आडगांव शिवारातील श्रीराम नगर येथील बजरंग निवास येथे घडली. अनिलकुमार तिवारी आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ाने त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडला. घरातील लोखंडी कपाटातील तिजोरी फोडली. यातील सोन्याचे दागिने, चांदीची देवादिकांची मूर्ती व २० ते २२ हजार रुपयांची रोख रक्कम असा एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा