घरात भूतबाधा असल्याने शांती नांदत नसल्याचे भासवित येथील एका दाम्पत्याला भोंदूबाबाने सुमारे ११ लाख, ३२ हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह त्याच्या पत्नीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा व इतर अमानुष, अघोरी प्रथाविरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरानजीक सावखेडा येथील रहिवासी ललित पाटील आणि महिमा ऊर्फ मनोरमा पाटील या दाम्पत्याने आपल्यात अघोरी शक्ती असल्याचे भासवून जळगावातील एका दाम्पत्यास कौटुंबिक स्वास्थ्य आणि आर्थिक प्राप्ती करून जळगाव येथील पीडित दाम्पत्य करोना काळात तणावात होते. या दाम्पत्याच्या पत्नीला तिची मैत्रीण महिमा उर्फ मनोरमा पाटीलने आपल्या पतीच्या अंगात देव येतो, असे सांगून ते अस्वस्थता दूर करतील, असे आमिष दाखविले.

सावखेडा शिवारातील एका सदनिकेत संबंधित महिला गेल्यानंत महिमाच्या पतीने ललित पाटीलने मयत दिराचा आत्मा तुझ्या अंगात शिरल्याने त्याची शांती करावी लागेल, असे सांगितले. पीडित दाम्पत्याने भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडून विविध ठिकाणी शांतिपूजा, विधी, होमहवनच्या नावाने सुमारे ११ लाख, ३२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने, तसेच रोख स्वरूपात भोंदूबाबाला दिले. प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर भोंदूबाबाने पैसे परत मागितल्यास अघोरी शक्तीने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले. पीडित दाम्पत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा येथील कार्यालयाशी संपर्क करीत माहिती दिली.

हेही वाचा : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी नंदुरबारमधून १२० बस, शंभर खासगी वाहने रवाना

अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष समितीच्या सदस्या नंदिनी जाधव (पुणे), राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख (पुणे), अण्णा कडलसकर (पालघर), महिला विभाग सदस्या नीता सामंत (चाळीसगाव) यांच्यासह पीडित दाम्पत्याने सोमवारी पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात भोंदू दाम्पत्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी, अमानुष, अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध करणार्या कायद्याच्या कलम ३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader