नाशिक – महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या व्यवस्थापन प्रशिक्षणात नाशिक फर्स्ट संस्थेच्या रस्ता सुरक्षा व जागरुकता अभ्यासाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आतापर्यंत दीड हजारहून अधिक पोलिसांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

गुन्हे अन्वेषण विद्यालयात राज्यातील पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या प्रशिक्षणाचा अत्यावश्यक भाग म्हणून वाहतूक शिक्षण उद्यान (ट्रॅफिक एज्युकेशन पार्क) येथील रस्ता सुरक्षा व जागरुकता प्रशिक्षण त्यांच्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीमध्ये संपूर्ण राज्यातील ग्रामीण पोलीस दल, सर्व आयुक्तालय व महामार्ग पोलीस दलातील वाहतूक शाखेतील पोलिसांचा समावेश असतो.

Pune RTO Initiates School Bus Inspection Drive
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पाऊल! स्कूलबस, व्हॅनवर कारवाईचा दंडुका; शाळांवरही होणार कारवाई
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Nagpur obc pilot training
सात कोटी खर्चूनही प्रशिक्षणाचे ‘विमान’ जमिनीवरच; ओबीसी समाजातील मुलांच्या नशिबी…
central government started internship program on pilot basis
पाच वर्षांत १ कोटी ‘इंटर्नशिप’ प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट
district administration is refusing to release teachers from BLO work
शिक्षण विभागाने सुटका करूनही शिक्षक बीएलओ कामात अडकलेलेच
Extension of time for teachers to pass TET and CTET
शिक्षकांना टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ… काय आहे निर्णय?
Loksatta pahili baju What is the next step of Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana
पहिली बाजू: आयुष्मान भारत : सर्वसमावेशक सेवेसाठी!
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर

हेही वाचा…नाशिक: राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राला तीन पुरस्कार

नाशिक फर्स्टतर्फे गुन्हे अन्वेषण विद्यालयातील आतापर्यन्त ३० तुकड्यातील १५७५ पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. दोन तासांचे रस्ता सुरक्षा आणि जागरुकता प्रशिक्षण हे सर्वांसाठी मोफत आहे.

आतापर्यंत नाशिक फर्स्टच्या वाहतूक शिक्षण उद्यानात दोन लाख ४३ हजारहून अधिक नागरिकांचे रस्ता सुरक्षा व जागरुकता प्रशिक्षण झाले आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, बस, रिक्षा चालकांचा समावेश आहे. ३१ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीना नाशिक फर्स्टचे वरिष्ठ सदस्य श्रीकांत करोडे, मयूर बागूल यांनी वाहतूक सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.