जळगाव – नितेश राणे आमच्याबद्दल जे काही बोलले आहे, ते चुकीचे आहे. त्यांनी आमच्यासारखी साडी घालून बघावे. आमच्यासारखा जन्म घेऊन बघावे. आमच्यासारख्या टाळ्या वाजवून बघावे. आमच्याबद्दल काय माहिती आहे त्यांना? आमच्याबद्दल बोलणार्‍यांचा निषेध असो, धिक्कार असो, अशा शब्दांत तृतीयपंथियांनी भाजपचे नेते नितेश राणे यांचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवारी दुपारी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पक्षाचे नेते सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, भागवत चौधरी आदींच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तृतीयपंथीही सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>नाशिक : शासन आपल्या दारीसाठी लाभार्थी वाढविण्याची धडपड; जिल्हा परिषदेतर्फे दोन लाखहून अधिक जणांना लाभ, प्रमाणपत्र

हेही वाचा >>>रानडुक्करांमुळे डाळिंब बागांचे नुकसान; बंदोबस्त करण्याची मागणी

आंदोलनात तृतीयपंथींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फडणवीस, बावनकुळे, राणे यांच्या प्रतिमांना काळे फासत, चपला मारत, पायदळी तुडवीत निषेध केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत भाजप नेत्यांचा निषेध केला. तृतीयपंथीयांनीही आमच्याबद्दल बोलणार्‍यांनी आमच्यासारखे जीवन जगवून दाखविण्याचे आव्हान देत भाजप नेत्यांचा निषेध केला. सहसंपर्कप्रमुख वाघ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असताना अजित पवारांना चक्की पिसवून दाखवू, असे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आता अजित पवार हेही सत्तेत आल्यानंतर त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहेत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. हा कलंक नाही का? समृद्धी महामार्गावर दुर्घटना झाली, त्याबाबत चिंता न करता त्याच दिवशी शपथविधी होतो. हा संस्कृतीला कलंक नाही का? तृतीयपंथींबद्दल नितेश राणे हे बोलतात, हा त्यांचा अपमान नाही? यापुढे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यास शिवसेना पध्दतीने त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. नीलेश चौधरी यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत निषेध केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of bjp leaders from the transgendar that they should be born like us amy