नाशिक : टाळेबंदीचा तिसरा टप्पा सुरू असतांना पुढील अनिश्चितता पाहता शहर परिसरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांनी घरचा रस्ता धरण्याचा चंग बांधला आहे. प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची असणारी आवश्यकता पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात परप्रांतीयांसह शहर परिसरात अडकलेल्या अन्य नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रवास करण्यास इच्छुक नागरिकांनी त्या त्या भागातील वैद्यकीय व्यावसायिकांकडून प्रमाणपत्र घेण्याची सुचना केल्याने अनेकांना आल्या पावली घरी परतावे लागले.

टाळेबंदीचा वाढता कालावधी नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. या अस्वस्थेतून शहरात अडकून पडलेली आणि हाताला काम नसलेल्या मजुरांनी पर्यायी मार्ग म्हणून आपल्या मूळ गावचा रस्ता धरला आहे. दिवसागणिक करोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता प्रशासनाकडून आरोग्य विषयक नियमांची काटेकोरपणे अमलबजावणीसाठी प्रयत्न होत आहेत. टाळेबंदीचा तिसरा टप्पा सुरू झालेला असतांना अनेकांना घरी जायचे आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यावर आपणास सहज प्रवास करता येईल, या आशेने सोमवारी सकाळपासून परप्रांतीयांसह अनेकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागात गर्दी करण्यास सुरूवात केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात लांबच लांब रांगा लागल्या. यामध्ये सामाजिक अंतर किंवा मास्क अशा कुठल्याही सुरक्षेचा अवलंब केला गेला नाही.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून १०० हून अधिक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु, वाढणारी गर्दी पाहता त्यावर नियंत्रणासाठी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली. वास्तविक, लाल क्षेत्रातून स्थलांतर करता येत नाही. परंतु, समाज माध्यमातून आलेल्या चुकीच्या माहितीमुळे लोकांनी रुग्णालयात गर्दी केली, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी नमूद केले. गर्दीत सुरक्षेचा कुठलाही अवलंब होत नाही. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आपल्या जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हे प्रमाणपत्र घ्यावे, अशी सुचना करण्यात येऊन ही संपूर्ण प्रक्रिया थांबविण्यात आली.

नाशिक शहर हे लाल क्षेत्रात असल्याने शहरातून कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गर्दी करू नये. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय होईपर्यंत वैद्यकीय विभागाच्या वतीने कोणालाही प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. मात्र फक्त परराज्यातील पोलीस परवानगीने ज्या नागरिकांना जाण्याची सोय होणार असेल अशा नागरिकांना प्रवासाकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येतील.

– डॉ. राजेंद्र त्र्यंबके  (महापालिका वैद्यकीय अधिकारी)