नाशिक – सर्वहारा परिवर्तन केंद्रात आदिवासी विद्यार्थिनींसोबत झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पालक मंत्री दादा भुसे यांनी दिली.त्र्यंबकेश्वरजवळी पहिने भागातील चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्रात आदिवासी मुलींसाठी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर नृत्य करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या नातेवाईक तसेच पालकांनी केला होता.
या संदर्भात पालकांच्या तक्रारीवरून इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात केंद्राच्या संचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार दिव्या संचेती यांनी वसतिगृह तसेच बाजूला असलेले सेवन नेचर पार्क या रिसोर्टवर कारवाई केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.