नाशिक : मालेगाव बाह्य मतदारसंघात सलग चार वेळा निवडून आलेले आणि महाविकास आघाडी, महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दादा भुसे यांची संपत्ती पाच वर्षात जवळपास तिपटीने वाढली आहे. विशेष म्हणजे दादा भुसे यांच्या पत्नी अनिता या त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.
शिवसेना दुभंगल्यानंतर अखेऱच्या टप्प्यात गुवाहाटीला जाणाऱ्यांमध्ये भुसे यांचा समावेश होता. महायुती सरकारमध्ये प्रथम बंदरे-खनिकर्म खाते नंतर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांची जबाबदारी भुसे यांनी सांभाळली. संपर्क संस्थेच्या अभ्यासात भुसे यांनी पाच वर्षात विधानसभेत एकही प्रश्न उपस्थित केला नसल्याचे उघड झाले होते. पाच वर्षांपूर्वी भुसेंच्या प्रतिज्ञापत्रात अवलंबित व्यक्तींमध्ये अजिंक्य आणि अविष्कार या मुलांचाही उल्लेख होता. तेव्हां या संपूर्ण कुटूबाची एकूण मालमत्ता सहा कोटी ९९ लाख रुपये इतकी होती. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अवलंबित व्यक्तींमध्ये कुणाचाही उल्लेख नाही. भुसे दाम्पत्याची सध्याची एकूण संपत्ती १८ कोटी ४० लाखांच्या घरात आहे.
हेही वाचा…सुवर्णनगरीतील गिरीश महाजन यांच्याकडे पावणेतीन किलो सोने, पाच वर्षात वार्षिक उत्पन्नात साडेचार पट वाढ
u
यात स्वत: भुसे यांच्याकडे तीन कोटी ४१ लाख आणि पत्नीकडे तीन कोटी ४९ लाखांची जंगम मालमत्ता आहे. भुसे यांच्याकडे एक कोटी २२ लाखाची स्थावर मालमत्ता असून पत्नीच्या नावे १० कोटी २८ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. भुसे यांनी मुलांना ७४ लाखांचे कर्ज दिले आहे. पत्नीने प्रवीण बच्छाव यांच्याकडून १५ लाखाचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे. कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या भुसे दाम्पत्यावर सुमारे ३० लाखाचे कर्ज आहे. भुसे हे प्रदीर्घ काळापासून राजकारणात आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच खटलाही प्रलंबित नाही.
एकूण मालमत्ता – १८ कोटी ४० लाख
२०१९ मधील मालमत्ता – सहा कोटी ९९ लाख
सध्याची जंगम (चल) मालमत्ता – सहा कोटी ९० लाख
स्थावर (अचल) मालमत्ता – ११ कोटी ५० लाख
गुन्हे – कोणताही गुन्हा दाखल नाही
शिक्षण – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका