इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील ४३ चिमुरडे विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा परिषदेवर निघाले आहेत. ‘तुम्ही आमची शाळा बंद केली आता आम्हाला शाळा नको, वळायला शेळ्या द्या’, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नाशिक : १५ अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक लावणार; जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Video-2022-10-11-at-11.25.50-AM.mp4

नाशिक जिल्ह्यात राज्य बाल हक्क आयोगाचा दौरा असून आयोगाच्या सदस्यांना विद्यार्थी भेटून शेळ्या देण्याची विनंती करणार आहेत. दरेवाडी गावातून हे विद्यार्थी थेट नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जमून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. दरेवाडी शाळा बंद केल्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली झाली आहे. ह्या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. शाळा बंद झाल्यामुळे गोरगरीब, वंचित आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातील. कमी पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा दुर्गम आणि वाहतुकीच्या सोयी सुविधा नसणाऱ्या ठिकाणी आहेत. या शाळा बंद झाल्यास इथे शिकणारे आदिवासी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे. दरेवाडी शाळा बंद प्रकरणी लोकशाही मार्गाने लढा तीव्र करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी दिली.