भुसावळ येथील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसर (पंजाब) येथील तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या चार मित्रांविरुद्ध भुसावळ येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनमितसिंग गुरुप्रितसिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा >>>राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामावर चोरट्यांचा डल्ला, पावणेपाच लाखाचा मद्यसाठा लंपास

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

मनमितसिंग हा पाच मित्रांसह बुधवारी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसमधून अमृतसरकडे जात असताना डी-२ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली. मात्र, संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधला. पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले. दरम्यान, गुरुवारी सकाळी दहापूर्वी मनमितसिंगचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे सोबत असलेल्या चार मित्रांनीच त्याचा खून केल्याचा संशय आहे.. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात चारही संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>जळगावात दोन मोटारींसह दुचाकीची जाळपोळ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, भुसावळच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनावेळी मृत व्यक्तीचे हात, पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे, तसेच गळा चिरल्याचे उघड झाले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. नंतर मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. मृताजवळ मिळालेल्या पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या डेबिट कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे संबंधित बँकेत चौकशी करीत मृतदेहाची ओळख पटविली.