धुळे: महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या २० वर्षांच्या तरुणीचा सोमवारी सकाळी येथील नकाणे तलावात मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या केल्याचा अंदाज असून प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नंदुरबार: कुपोषण, बालमृत्यूवरील मुदतबाह्य औषधसाठा उघड्यावर – कारवाई न झाल्याने आश्चर्य

 चेतना पुरुषोत्तम पाटील ( रा.यशोधन कॉलनी, वलवाडी, धुळे) ही तरुणी सोमवारी सकाळी महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. काही वेळाने तिचा मृतदेह येथील नकाणे तलावात तरंगतांना परिसरातील नागरिकांना दिसला. यावेळी तिची दुचाकी तलावाजवळच लावलेली होती. ही माहिती तालुका पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन काही तरुणांच्या मदतीने चेतनाचा मृतदेह बाहेर काढला. तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Story img Loader