धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पोलिसांनी वाहनासह १२ तलवारींसह इतर प्राणघातक हत्यारे असा सहा लाख, २९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “पूर्वसूचनेशिवाय शेतीचा वीज पुरवठा खंडित करू नका”; दादा भुसे यांचे निर्देश

शिरपूर पोलीस ठाण्याचे संदीप शिंदे यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता वाहनात १२ तलवारी, दोन गुप्त्या, चॉपर, चाकू, दोन लोखंडी फायटर अशी हत्यारे आढळली. ही प्राणघातक हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी वाहनासह सर्व शस्त्रे जप्त केली असून त्याची किंमत सहा लाख, २९ हजार रुपये आहे. या प्रकरणी सतपाल सोनवणे, किरण धुळेकर, विकास ठाकरे, सखाराम पवार,सचिन सोनवणे,राजू पवार, विशाल ठाकरे, संतोष पाटील,अमोल चव्हाण, विठ्ठल सोनवणे (हे सर्व संशयित धुळे तालुक्यातील लळींग,जुन्नर या भागातील रहिवासी आहेत.) या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शिरपूर पोलिसांना १० हजाराचे बक्षीस जाहीर केले.