नाशिक: सुरगाणा येथील वीज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गणेश गुंबाडे हे बाह्य स्रोत कर्मचारी (कंत्राट पद्धतीने) काम करणारे म्हणून सुरगाणा शहराला परिचित होते. बुधवारी दुपारी गुंबाडे हे सुरगाणा महाविद्यालया जवळील एका सिमेंट खांबावर चढून काम करत होते. तत्पुर्वी विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. मात्र जवळूनच बोरगांवसाठी गेलेल्या वाहिनीचा विद्युत प्रवाह सुरु होता. त्या वाहिनीचा धक्का गुंबाडे यांना लागला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांची पत्नी काजल या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा