नाशिक: बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो नागरिक सहभागी झाल्यामुळे नियोजनाअभावी सावळागोंधळ उडाला होता. काही जण बैलगाड्यांखाली सापडून जखमी झाले होते. त्यातील एका जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्हसरूळ ग्रामस्थ आणि सोमनाथ वडजे यांच्या पुढाकारातून म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रस्त्यावरील ठक्कर मैदानावर आयोजित बैलगाडा शर्यंत अनेक कारणांमुळे गाजली होती. याप्रसंगी स्थानिक आमदार राहुल ढिकले उपस्थित होते. विजेत्यांसाठी मोटारसायकल, ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार रुपयांसह दीड हजार रुपयांची अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती. शर्यतीत २०० हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. पण नियोजनाचे तीनतेरा वाजले होते. रणरणत्या उन्हात मैदान प्रेक्षक व बैलगाड्यांनी भरून गेले होते. चार ते पाच बैलगाड्या एकाच वेळी धावू शकतील, अशी शर्यत मार्गाची व्यवस्था होती. पण हा मार्ग बंदिस्त नसल्याने धावत्या बैलगाड्यामध्ये आलेले काही प्रेक्षक जखमी झाले. एक युवक बैलगाडीवरून पडला होता. सायंकाळपर्यंत आठ जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले गेले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले श्रावण सोनवणे (चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रस्ता) हे जखमी झाले होते. त्यांना प्रथम खासगी रुग्णालय व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोनवणे यांचा मुलगा गितेश यांनी दिली.

हेही वाचा >>>वाहन चालक परवाना प्रक्रिया कठोर करण्याची गरज- विवेक फणसाळकर

दरम्यान, शर्यतीवेळी जखमी झालेल्या पाच जणांवर मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे. अन्य तीन जखमींना मनपाच्या रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती स्थानिक आमदारांच्या कार्यालयातून देण्यात आली. बैलगाडा शर्यतीमुळे मृत्यू झालेल्या सोनवणे कुटुंबियांना मदत देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.