लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघातील निकालावर आक्षेप घेत १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या यांच्या सखोल पडताळणीची मागणी महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक शाखेकडे केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पाच टक्के केंद्रांच्या यंत्रांची तपासणीची मागणी करता येते. परंतु, यामध्ये संबंधित यंत्रावर नव्याने केवळ मतदानाचे प्रात्यक्षिक घेऊन पडलेली मते आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या हे उमेदवार पडताळून पाहू शकतो. त्यामुळे एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी वा फेरपडताळणीची मागणी निकालात निघत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून निकालाविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. मतमोजणी आधी बडगुजर यांनी सात केंद्रात मतदान यंत्र अथवा व्हीव्ही पॅट परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप केला होता. परंतु, निवडणूक शाखेने ते फेटाळले. आता निकालावर बडगुजर यांनी शंका उपस्थित करुन १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅटची सखोल पडताळणीची मागणी निवडणूक शाखेकडे केली. त्या केंद्रांची यादी त्यांनी सादर केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यास लेखी उत्तर दिले. त्यानुसार यासाठी पाच टक्के केंद्रांच्या निकषानुषार प्रति मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅटसाठी ४० हजार रुपये आणि १८ टक्के जीएसटी यानुसार शुल्क विहित मुदतीत भरावे लागेल. शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीईएल कंपनीचे अभियंता यांच्याकडून उमेदवारासमोर मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट यंत्राची तपासणी केली जाईल, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्यानंतर पत्नीवर हल्ला

निवडणूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तपासणी म्हणजे फेरमतमोजणी वा फेरपडताळणी नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवार ज्या पाच टक्के केंद्रावरील यंत्र सांगतील, त्यावर मतदानाचे प्रात्यक्षिक होईल. म्हणजे या यंत्रावर नव्याने ५०० किंवा हजार मतदान केले जाईल. हे मतदान आणि व्हीव्ही पॅट यंत्रावरील चिठ्ठ्या यांची पडताळणी करून ती यंत्रे योग्यप्रकारे कार्यरत असल्याची उमेदवाराला खात्री करुन देता येईल. हे प्रात्यक्षिक करण्याआधी त्या यंत्रावरील सर्व माहिती पुसावी लागते. म्हणजे, त्या यंत्रावरील प्रत्यक्ष निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती नष्ट होईल.

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मतमोजणी सुरू असताना फेरमतमोजणी करता येते. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी वा फेरपडताळणीची मागणी ग्राह्य धरली जात नाही, असेही संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान बडगुजर यांच्याप्रमाणे नाशिक पश्चिम मतदार संघातील मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनीही निकालावर संशय व्यक्त केला आहे.