लोकसत्ता वार्ताहर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नंदुरबार: प्रसुतीसाठी महिलेला नंदुरबार रुग्णालयात घेवून येणारी १०८ रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने महिलेची बंद रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. नंदुरबारपासून जवळच गुजरात राज्यातील तापी नदीवर असणाऱ्या हातोडा पुलावर ही घटना घडली. रुग्णवाहिका चालकाने इतरांकडे मदत मागूनही कोणीही पुढे आले नाही.
जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शेंडगाव येथील रहिवासी संजना पावरा यांना प्रसुतीसाठी बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. महिलेला घेवून येणारी १०८ रुग्णवाहिकेचे तळोदा सोडल्यानंतर हातोडा पुलानजीक टायर पंक्चर झाले. वाहनात पर्यायी चाक उपलब्ध नसल्यामुळे चालकाने पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली. मात्र वेळेवर मदत उपलब्ध होऊ शकली नाही. अशातच भर उन्हात रुग्णवाहिकेतच महिला प्रसुत झाली. नंदुरबार येथून पर्यायी रुग्णवाहिका आल्यानंतर माता आणि बाळाला नंदुरबारकडे हलविण्यात आले.
आणखी वाचा-त्र्यंबकेश्वर प्रकरणी एसआयटी पथकाकडून चौकशीला सुरुवात
नंदुरबार येथील १०८ रुग्णवाहिकेच्या डॉ. अंजली अग्रवाल यांनी रुग्णवाहिकेत उपचार सुरु केले. यानंतर संबंधीत महिला आणि तिच्या बाळाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा १०८ रुग्णवाहिकांची स्थिती पुढे आली. गाडीचे टायर नादुरुस्त असतांना ते बदलण्याची तसदी प्रशासनाकडून का घेण्यात आली नाही, गाडीत पर्यायी टायर का उपलब्ध नव्हते, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.