नाशिक – उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.एड आणि एम.एड (शिक्षणशास्त्र) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) मुदतवाढ दिली आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या अजूनही काही समस्या असल्याने ही मुदतवाढ पुरेशी नाही. परिणामी, ३१ जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजित तांबे यांनी मुदत वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात ७२ टक्के पेरण्या; साडेचार लाख हेक्टरवर कपाशी लागवड

हेही वाचा – जळगाव: वैज्ञानिक युगातही अंधश्रध्देचे जोखड, चाळीसगावात गुप्तधनासाठी पूजा; मांत्रिकासह नऊ जणांविरुध्द गुन्हा 

बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत ४७ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. तर त्यातील ४१ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ३० हजार ७११ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. तर एम.एड अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत एक हजार ४९० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील एक हजार ११८ विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले होते. परंतु, अनेक विद्यार्थी बी.एड आणि एम.एड प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. उच्च शिक्षण विभागाने बी.एड आणि एम.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी किंवा इतर कोणतीही अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for extension of online admission registration for degree in education and post graduate ssb
First published on: 17-07-2023 at 16:46 IST