पहिल्या पावसात अनेकांची घरे गळू लागली; शेती उपयोगी साहित्याचे नुकसान
मनमाड : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शहर आणि परिसरात तडाखेबंद पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळी कामांनाही सुरुवात झाली. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा कागद, अस्तर, ताडपत्री यांना मोठी मागणी असते. स्थानिक बाजारपेठेत याची अनेक दुकाने थाटली असून महागाईचा फारसा परिणाम या व्यवसायावर झालेला नाही. त्यांची मागणी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्याच पावसाने अनेकांची घरे गळू लागली. शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांनी पाऊस संपताच बाजारपेठेत धाव घेऊन प्लास्टिक कागद आणि कापड खरेदीला सुरुवात केली आहे. आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक कागद व ताडपत्रीचा ग्रामीण व शहरी भागात मोठय़ा प्रमाणामध्ये वापर केला जातो. दोन वर्षे करोना प्रादुर्भावाचा फटका या व्यवसायाला बसला. त्यामुळे साहजिकच मालाची विक्री अत्यल्प प्रमाणात झाली. आता पावसाचे वेध लागल्याने प्लास्टिक विक्रीला प्रतिसाद मिळत आहे.

साधारणत: मेअखेरीस प्लास्टिक विक्रीला सुरुवात होते. मान्सूनपूर्व पावसापूर्वी नागरिक प्लास्टिकचे कागद, कापड आणून छतावर टाकतात. पिकांना झाकण्यासाठी, धान्य-चारा झाकण्यासाठी देखील या कापडाचा वापर केला जातो. त्याची ही खरेदी जवळपास १५ ते २० दिवस अगोदर सुरू होते. पहिला पाऊस झाल्यानंतर कापड आणि कागद खरेदीचा जोर वाढतो. मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांनीही प्लास्टिकचे कागद, कापड खरेदीला गर्दी केली आहे.

दर्जा आणि जाडीनुसार मीटरप्रमाणे प्लास्टिक कापड आणि कागदाचा भाव दिसून येतो. कमी-अधिक जाड, विविध रंग आणि टिकाऊ दर्जा यानुसार ताडपत्रीचे भाव ठरतात. घराच्या छतावर टाकण्यासह शेतीमाल झाकण्यासाठी आणि झोपडपट्टीधारक ताडपत्रीचा प्रामुख्याने वापर करताना दिसून येतात. बाजारपेठेत प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यात मुख्यत्वे ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांचा समावेश आहे.

दर कसे?
प्लास्टिक कागद आणि कापडाचे भाव दर्जाप्रमाणे ३० ते ६० रुपये मीटर असा आहे. तर ताडपत्रीचे भाव ५०० ते ३००० रुपयांपर्यंत आहेत. महागाईचा सर्वत्र फटका बसत आहे. तरी प्लास्टिक कागद, कापड या व्यवसायावर दरवाढीचा परिणाम दिसत नाही. काळे, पांढरे, पिवळे, लाल आदी रंगांचे प्लास्टिकचे कागद आणि कापड बाजारपेठेत उपलब्ध आहेत. जाडीनुसार आणि दर्जानुसार यांचे भाव असतात. अनेक जण प्लास्टिक कागद आणि कापड खरेदीऐवजी ताडपत्रीला प्राधान्य देत आहेत. ताडपत्रीचे भाव पाचशे रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहेत.