लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: मणिपूर राज्यातील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी धुळे महानगर नागरिक मंचतर्फे क्युमाईन क्लब समोर निदर्शने करण्यात आली.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. महिलांवरील अत्याचाराचे पडसाद राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटल्यामुळे देशाची बदनामी झाली असून भारतीय नागरिक म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारा हा प्रकार असल्याची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर हिंसाचाराला कारणीभूत ठरणाऱ्या आणि अत्याचारात सहभागी होणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणे अपेक्षित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा… …आणि भर कोर्टात न्यायाधीशांनी राजीनाम्याची केली घोषणा; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची चर्चा!

विशेष म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षातर्फे नव्हे तर, धुळेकरांच्या सहभागातून अहिंसक मार्गाने ही निदर्शने झाली. यावेळी प्रा. बी. ए. पाटील, अविनाश पाटील, रामदास जगताप, दिलीप देवरे, पोपटराव चौधरी, डी. टी. पाटील आदींनी सहभाग घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstrations in dhule to protest manipur violence dvr