धुळे : राज्य घटनेतील तरतूदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एस. टी.प्रवर्ग) दर्जा मिळाला असून त्या आरक्षणाची तातडीने अमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज महासंघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, जिल्हा संघटक चुडामण पाटील, भगवान गर्दे, नगरसेवक अमोल मासुळे आदी सहभागी झाले होते. या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या घटनेत महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एस.टी.प्रवर्ग) दर्जा मिळाला आहे. परंतु, ७० वर्षे झाली तरी या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे धनगर समाजावर अन्याय होत असल्याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन समाजाला अनुसूचित जमातीचा (एस.टी.प्रवर्ग) दर्जा मिळावा म्हणून लढा देत आहे. राज्य सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एस.टी.प्रवर्ग) दर्जाची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार करावा. अधिवेशनात वटहूकुम काढावा, अशी मागणी सकल धनगर समाजाने केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstrations of dhangar samaj federation in dhule ysh