मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर अटक झाली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस हिरे यांच्या मागावर होते. त्यानुसार बुधवारी पहाटे भोपाळ येथून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले आहे.
येथील द्याने भागात उभारण्यात आलेल्या हिरे कुटुंबियांशी संबंधित सूतगिरणीसाठी १० वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सात कोटी ४३ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने ३१ कोटीच्यावर थकबाकीची रक्कम गेली. कर्जफेड न झाल्याने बँकेने सूत गिरणीची तारण मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तेव्हा प्रकल्पाचे बांधकाम आणि यंत्रसामुग्री हे आराखड्यानुसार नसल्याचे तसेच सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम हिरे कुटुंबाशी संबंधित व्यंकटेश सहकारी बँकेत वळती करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यात येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात या दोन्ही संस्थांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा