नाशिक – मागील दशकभरात एकसंघ आणि फूट पडल्यानंतरही शिवसेनेच्या महानगर अर्थात शहर प्रमुखांची यादी पडताळल्यानंतर ललित पाटील या नावाची कुणी व्यक्ती शहरप्रमुख म्हणून कार्यरत नसल्याचे दिसून येते. शिवसेनेत शाखाप्रमुख हे स्थानिक पातळीवर एखाद्या क्षेत्रापुरते मर्यादित पद मानले जाते. शहरातील संघटनेच्या उतरंडीत ते अखेरचे महत्त्वाचे पद. राज्यातील अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटीलला (पानपाटील) आजवर शाखाप्रमुख म्हणूनही कधी संधी दिली नव्हती. तर शहर प्रमुखाची गोष्ट दूर राहिली, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटातून उमटत आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिक शहरप्रमुख असल्याचा केलेला दावा खोटा असून निव्वळ संभ्रम पसरवण्यासाठी असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. एकसंघ शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे (ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी महानगरप्रमुख निर्मितीनंतर आजवर शहरप्रमुख अर्थात महानगरप्रमुख पदावर काम करणाऱ्यांची यादी मांडून गृहमंत्र्यांचा दावा खोडून काढला. शिवसेनेत या पदाची निर्मिती झाल्यानंतर नाशिकचे पहिले शहरप्रमुख (महानगरप्रमुख) म्हणून नंदन रहाणे यांनी काम केले होते. पुढील काळात माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, देवानंद बिरारी, अर्जुन टिळे, नीलेश चव्हाण, अजय बोरस्ते (सध्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख), महेश बडवे, सचिन मराठे आणि सध्या सुधाकर बडगजुर यांनी या पदावर काम केले आहे. ललित पाटील संघटनेत शाखाप्रमुखदेखील नव्हता, असा दावा त्यांनी केला. ललित पाटील ही व्यक्ती शहरातील पक्षाच्या कार्यालयातही कधी आली नव्हती. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे त्याला तेव्हा मातोश्रीवर घेऊन गेले होते. त्यांनी प्रवेश घडवून आणला. केवळ महिनाभर तो पक्षात होता, त्याला साधे शाखाप्रमुख पदही दिले गेले नव्हते, असे गायकवाड यांनी नमूद केले.

vinod tawde
जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
amit thackeray vs aadityathackeray maharashtra assembly election
‘राजपुत्रा’ची ‘उद्धवपुत्रा’वर थेट टीका; अमित ठाकरे म्हणाले, “तुम्ही लोकप्रतिनिधी असाल…”
loksatta readers response
लोकमानस: चाल, चरित्र बिघडल्याने भामटेगिरीला ऊत
uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”
Hindi language is compulsory from first standard in Maharashtra
हिंदी भाषा सक्तीचा हा कसला दुराग्रह?
miraj vidhan sabha
मिरजेवर ठाकरे गटाचा दावा; अन्यथा ‘सांगली पॅटर्न’चा इशारा
uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?

हेही वाचा – खान्देश कुलस्वामिनी धुळ्याची एकविरा देवी

हेही वाचा – नांदगावमध्ये ‘अमृत कलश’ यात्रेत मराठा आंदोलकांचा गोंधळ; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राज्याच्या गृहमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत व्यक्तीने प्राथमिक माहिती घेऊन विधाने करायला हवीत, याकडे लक्ष वेधले. ललित हा कधीही शिवसेनेचा महानगरप्रमुख नव्हता. २०१७ मध्ये दादा भुसे यांच्या माध्यमातून तो मातोश्रीवर गेला. तेव्हा तत्कालीन संपर्कप्रमुख भाऊ चौधरी आणि खासदार संजय राऊत उपस्थित नव्हते. तेव्हा पाटीलने पदाची मागणी केली होती. पण त्याला तत्कालीन महानगरप्रमुख बोरस्ते यांनी कुठलेही पद दिले नव्हते. प्रभाग १६ मधून पाटीलने शिवसेनेची उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने तीही नाकारली, असे बडगुजर यांनी सांगितले. फडणवीस यांनी केलेले आरोप मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप गायकवाड यांनी घेतला. नाशिक शहरात शिवसेनेचे कोण महानगरप्रमुख आजवर होते आणि आहेत, हे नागरिकांना सर्वज्ञात आहे. पण राज्यातील उर्वरित भागातील नागरिक त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे संभ्रम पसरवण्यासाठी गृहमंत्र्यांनी ही विधाने केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.