नाशिक– धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सोमवारी नाशिकरोड येथील दत्त मंदिर चौकातील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. उपनगर पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन

राज्यात धनगड जमात अस्तित्वात नसून धनगर असल्याचे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे. त्या अनुषंगाने सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही धनगर बांधवांनी धनगड जातीचे बनावट दाखले काढले असून ते रद्द करण्यात यावेत, आदिवासी जमातीच्या सात टक्के आरक्षणाला धक्का लागू नये, अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ क्रमांकाला असलेल्या धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करुन अनुसूचित जमातीचे दाखले वितरीत करण्यात यावेत, आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या. दत्त मंदिर चौकात धनगर समाज कार्यकर्ते एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी भाऊलाल तांबडे, राजाभाऊ पोथारे, नवनाथ ढगे, नितीन धानापुणे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhangar community protest for reservation from scheduled tribes zws