धुळे – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाच कंदिल भागातील रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम धुळे शहर वाहतूक शोखेने हाती घेतली आहे. रस्त्यावरील फेरीवाले आणि पथारीवाल्यांना वाहतूक शोखेचे सहायक निरीक्षक भूषण कोते यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.  शहरातील आग्रारोडवरील गांधी पुतळा ते पाच कंदिल या भागात मुख्य बाजारपेठ आहे. या भागातील रस्त्यावर सर्रासपणे गाड्या लावून तसेच बसून विक्रेते व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतूक कोेंडी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा निम्म्याहून कमी जलसाठा; जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२ टक्के पाऊस

नागरिकांना मार्गस्थ होणे कठिण होते. त्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक कोते यांनी मुख्य बाजारपेठेतील हातगाडीधारक, फेरीवाले, भाजीपाला, फळविक्रेते यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मयूर पाटील, दीपक दामोदर, विलास मालचेे, तौसिफ शेख, विनायक भामरे, ज्ञानेश्वर देसले, प्रसन्न पाटील उपस्थित होते. यावेळी कोते यांनी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन व्यवसाय करु नये, अशी सूचना केली. तसेच दुकानासमोर व्यवसायाला परवानगी देणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करण्यात येईल, आज केवळ समजावून सांगत आहोत, यापुढे रस्त्यावर असे अतिक्रमण दिसल्यास संबंधितांविरुध्द थेट कारवाई केली जाईल, असा इशारा निरीक्षक कोते यांनी दिला आहे.