धुळे : जिल्ह्यात गुन्हे वाढतच असून त्याचा फटका पुणे येथील एका कंपनीलाही बसला असून या कंपनीचे वाहन जिल्ह्यात अडवून अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आपल्याकडे वेळ नसल्याने अडीच लाख रुपये त्वरीत देण्याची मागणी संबंधितांकडून करण्यात आली. तडजोडीअंती संशयितांनी एक लाख पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु, पैशांची मागणी करणारे आहेत तरी कोण, ते जाणून घेऊ.

उपलब्ध माहितीनुसार १० ऑक्टोबर २०२३ रोजी ही घटना घडली आणि आठ मे रोजी पुणे येथील इन्फिनिटी सोल्यूशन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठले. दिल्ली येथे चार ते सहा ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बांधणीच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात पुणे येथील इन्फिनिटी सोल्यूशन्स कंपनीनेही सहभाग घेतला होता. या प्रदर्शनासाठी कंपनीने एका वाहनातून यंत्रसामग्री नेली होती. प्रदर्शन संपल्यानंतर पुण्याकडे परतत असतांना वाहनचालक सतीश डांगी यास जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून अडविण्यात आले. अडीच लाखाची मागणी झाली. या घटनेच्या अनुषंगाने १० ऑक्टोबर रोजी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महेश नवले यांनी हिशेब व्यवस्थापक रोहित कुळकर्णी यांना या घटनेची माहिती दिली. ज्यांनी वाहन थांबविले, त्यांच्याशी संपर्क साधावा, असे सुचविले. कुळकर्णी आणि नवले यांनी नंतर संबंधित व्यक्तीला भ्रमणध्वनी केला असता त्याने आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून वाहन चालकाकडे असलेले चलन चुकीचे असल्याचे सांगितले. यामुळे यंत्रे जप्त करण्यात येत आहेत, अशीही माहिती दिली.आपणास वाहन परत हवे असेल तर तातडीने दोनशे टक्के दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले.

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर

हेही वाचा…लाच प्रकरणानंतर पुरातत्व विभागाचा कारभार चर्चेत

ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती करतो, असे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र संबंधिताने यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याचे स्पष्ट करून अडीच लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. तडजोडीअंती संशयितांनी एक लाख पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्यावर मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चालकाशी संपर्क केला असता त्याने शिरपूरजवळ हाडाखेड येथे सीमा तपासणी नाक्याजवळ राजस्थानी ढाब्यावर एक वाहन उभे असून, त्यातील चार जणांनी आपले वाहन थांबविले असल्याची माहिती दिली. या वाहनावर ‘पोलिस’ असे लिहिले असल्याचेही तो म्हणाला. कंपनीचे कार्यकारी संचालक अमित कटारिया यांच्यापर्यंत ही माहिती पोहचल्यानंतर त्यांनी कंपनी अधिकाऱ्यांना हे प्रकरण हाताळण्याचे निर्देश दिले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोन पे वरून ठरलेली रक्कम संशयितांना दिली. यानंतर संशयितांविरुद्ध सांगवी (ता.शिरपूर) पोलिसांना माहिती देऊन फिर्याद दाखल करण्यात आली. धुळे,जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून एक लाख रुपये उकळल्याप्रकरणी सांगवी (ता. शिरपूर) पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा…राजकीय आकसामुळेच बडगुजर यांना नोटीस – मविआचा आरोप

धुळे येथील बनावट जीएसटी अधिकारी प्रकरण ताजे असतांना पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आल्याने आता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना अशा स्वरूपाचे गुन्हे आणखी कोणकोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत, याचा तपास करावा लागणार आहे.