धुळे : धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सात कामचुकार अंमलदारांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अंमलदारांमध्ये साक्री येथील प्रदीप ठाकरे, राकेश बोरसे, मुक्ता वळवी, विनोद गांगुर्डे आणि किशोर पारधी अशा पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय नियंत्रण कक्षातील महेंद्र ठाकूर आणि मोटारवाहन विभागाचे अमोल भामरे यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. धिवरे यांनी जिल्हा अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर विद्यमान पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि प्रशासकीय कामकाज पाहणार्‍या जवळपास सर्वांच्याच कार्यपध्दतीची त्यांच्या विशिष्ट पद्धतीने माहिती घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधकचे १६१ सापळे, २३५ लाचखोरांवर कारवाई

यानंतर जिल्ह्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करुन नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. नाकाबंदी कालावधीतच दंगाविरोधी पथकातील काही अंमलदार अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असल्याचे उघड झाले. काही अंमलदारांशी वरिष्ठ अधिकार्‍यांनी बिनतारी संदेशाव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बेपर्वाई केली. वरिष्ठांची परवानगी न घेता ते कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यातील इंधन, गॅस वाहतूकदारांचा संप; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील इंधन पुरवठा ठप्प

या पार्श्वभूमिवर अधीक्षक धिवरे यांनी अशा कामचुकार सात जणांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर, त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश पत्रात म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका तसेच इतर महत्वाच्या बंदोबस्तावेळी कोणी कामात दिरंगाई किंवा कामचुकारपणा करु नये, हा कारवाईमागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule district superintendent of police suspends 7 police officials for misconduct ahead of elections css
Show comments