धुळे : कुठलीही करवाढ नसलेला २०२५-२६ चा मूळ समितीने सादर केलेला अर्थसंकल्प शुक्रवारी धुळे महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी अतिरिक्तआयुक्त करूणा डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, नगरसचिव मनोज वाघ आदींसह अधिकारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे दर ३६ रून ३० टक्क्यांवर आणले आहेत. एप्रिलपासून नागरिकांना या दरानेच देयके मिळतील. शहरात नव्याने बांधलेल्या १७ हजार मालमत्तांमुळे उत्पन्नात १० कोटींची भर पडेल. भुयारी गटारसह विविध योजना या शासकीय निधीतून करण्यावर भर राहणार आहे. पारोळा रोडवरील शाहु महाराज नाट्यमंदिराजळील सावता माळी मार्केटमध्ये महिला बचतगटांसाठी सुविधा देण्यात येणार आहे. त्यात एकूण १७६ गाळे असतील. यातून मनपाला ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. महिला सक्षमीकरण, विविध योजनांसाठी पाच टक्के तसेच अपंगांसाठी पाच टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी अपंगांचे बायोमॅट्रीक सर्व्हे करण्यासह त्यांना विविध साहित्य उपलब्ध करणे, शिबीर घेणे, याबरोबरच त्यांना यंदा एक हजारची वाढ करून पाच हजार रुपये देण्याची तरतूद करण्यासह दिव्यांग भवन देखील प्रस्तावित असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

श्वान निर्बिजीकरणासाठी कचरा डेपोजवळील शेडमध्ये व्यवस्था पूर्ण झाली असून १५ दिवसात निर्बिजीकरणाचे काम सुरू होईल. उद्यान, अवधान येथे सौर उर्जा प्रकल्प, नदी सुधार योजना, वलवाडीत भाजी मंडई, दसेरा मैदानात व्यापारी संकुल, इ-बस सेवा केंद्र, पेट्रोल पंपसह चार ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जीग केंद्र, संविधान भवन, शासकीय सेवेत कार्यरत महिलांसाठी देवपूरमध्ये वसतिगृह निर्मिती, शौचालये, सरस्वती उद्यान या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद प्रस्तावित आहे नागरिकांसाठी ऑनलाईन सेवांवर भर देण्यात आल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Story img Loader