थकित पगार न झाल्यास १९ एप्रिल रोजी कोणत्याही क्षणी आपल्या दालनासमोर आत्मदहन करू ,असा इशारा महापालिकेच्या संजय अग्रवाल यांच्यासह २१ कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना दिला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,की अक्षय तृतीया सारखा सण तोंडावर आलेला असताना कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार झालेला नाही.शासकीय अनुदान आलेले नाही.असे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची बोळवण केली आहे.दुसरीकडे मात्र मार्च महिन्यामध्ये कर वसुली मोहीम राबवून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत.या रकमेतून पगार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>नाशिक: संभाव्य टंचाईला तोंड देण्याची तयारी; विशेष आराखड्यात पालकमंत्र्यांच्या मालेगावला झुकते माप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,रामनवमी व हनुमान जयंती असे उत्सव झाले.आता अक्षय तृतीये सारखा सण तोंडावर आलेला असताना पगार होणे गरजेचे आहे.१९ एप्रिल पर्यंत पगार न झाल्यास कुठल्याही क्षणी आपल्या दालनासमोर पेट्रोल अंगावर टाकून घेत आत्महत्या करू.असा इशारा प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आला आहे.पत्रकावर नितीन जोशी,संदीप गवळी,प्रल्हाद जाधव, संगीता जांभळे,अनिल सुडके,राजेंद्र गवळी,जाकिर बागवान आदी २१ जणांची स्वाक्षरी आहे