धुळे: दिल्लीहून मुंबईकडे बेकायदेशीरपणे होणारी गुटख्याची वाहतूक धुळे पोलिसांनी रोखली असून कंटेनरसह ४८ लाख ४३ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालकास अटक करण्यात आली असून त्याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याजवळील सोनगीर टोल नाक्याजवळ ही कारवाई झाली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पगार यांनी तक्रार दिली. तंबाखुजन्य पदार्थांना महाराष्ट्रात प्रतिबंध असताना दिल्लीहून मुंबईकडे गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने सोनगीर टोल नाक्याजवळ पथक तैनात करण्यात आले होते.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा… घर रिकामे करण्यासाठी खंडणीची मागणी; धुळ्यात भाडेकरुंच्या धमकीमुळे घरमालकाची आत्महत्या

संशयित कंटेनर येताच पोलिसांच्या मदतीने तो अडविण्यात आला. तपासणी करण्यात आली असता प्रतिबंधित पानमसाला, गुटखा सदृश्य माल आढळला. दिल्लीहून मुंबईकडे हा माल नेण्यात येत असल्याची कबुली चालकाने दिली. पोलिसांनी या प्रकरणी चालक दिलीपकुमार दुबे (रा. कुसवडा, उत्तरप्रदेश) यास अटक केली. रिंकूसिंग (रा. दिल्ली), सिकंदर (रा. मुंबई), राजेश आणि कंटेनर मालकाविरूद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.