लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी न घेता आरटीओ कार्यालयासाठी आदिवासींच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत शुक्रवारी येथे रिपब्लिकन मजूर कामगार संघटनेतर्फे मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या संदर्भात शिष्ठमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

आदिवासी समाजावर शासनातर्फे जाणीवपूर्वक अन्याय होत असून रिपब्लिकन मजूर कामगार संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धुळे येथील आदिवासी समाजाच्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक परिवहन महामंडळासाठी कार्यालय थाटण्याचा घाट घातला आहे.

हेही वाचा… बनावट दारु निर्मितीतील संशयित दिनू डाॅन अखेर ताब्यात

पोटहिश्याची मोजणी न करता सामाईक असलेल्या या गटावर आरटीओ कार्यालयासाठी अतिक्रमण करुन आदिवासी समाजाला भूमिहीन केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर रिपब्लिकन मजूर कामगार संघटनेचे रवींद्र नेटावटे यांच्यासह प्रकाश पिल्ले, उदय पगारे, संजय पाटील, अनिल वाघ आदींची स्वाक्षरी आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule rto has encroached on tribal land for the rto office without taking permission a protest was held by the republican labor union dvr