Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यातील धुळे शहर हे उत्तर पश्चिम महाराष्ट्रात वसलेले आहे. पांजरा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात एमआयडीसी, आरटीओ आणि एमटीडीसीचे प्रादेशिक मुख्यालय आहे. आदिशक्ती एकविरा आणि स्वामीनारायण मंदिरामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. राज्यभरात कापड, खाद्यतेल, माहिती तंत्रज्ञान आणि यंत्रमागाचे आगामी केंद्र म्हणून धुळे शहर उदयास येत आहे. हे शहर एनएच -३, एनएच – ६ आणि एनएच २११ या तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडून असल्याने त्यास धोरणात्मक फायदा झाला आहे. शाह फारुक अनवर हे धुळे शहराचे आमदार आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शाह फारुक अनवर यांना एमआयएम पक्षाकडून धुळे शहर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे.

शाह फारुक अनवर हे एआयएमआयएम पक्षाचे नेते आहेत. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते धुळे शहर मतदारसंघातून निवडून आले होते. शाह हे २०१३ ते २०१७ पर्यंत राष्ट्रवादीबरोबर होते. नंतर २०१९ मध्ये ते एआयएमआयएम पक्षाचे सदस्य झाले.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
maharashtra assembly Election 2024 shekap fights for survival alibag assembly constituency
अलिबागमध्ये शेकापची प्रतिष्ठा पणाला
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की

धुळे हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु भाजप आणि एमआयएमने त्यास कडवे आव्हान दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार निवडून आले होते. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस, मालेगाव बाह्य शिवसेना, शिंदखेडा आणि बागलाण मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला होता.

हेही वाचा – महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”

अल्पसंख्याकांची मते विधानसभा निकालावर प्रभाव पाडू शकतात

धुळे शहरातील अल्पसंख्याकांची मते हे विधानसभा निकालावर प्रभाव पाडू शकतात. मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये, हे मोठे आव्हान शाह फारुक अनवर यांच्यापुढे असेल. निवडणुकीत भाजप, काँग्रेसचे आव्हान असेलच, तसेच वाढती बेरोजगारी, औद्योगिक मागसलेपण, आदी समस्याही निवडणुकीच्या तोंडावर अनवर यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतात.

हेही वाचा – Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

एमआयएमकडून पुन्हा शाह फारुक अनवर यांना उमेदवारी

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने धुळे शहर मतदारसंघातून पुन्हा शाह फारुक अनवर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचे आव्हान आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून अनिल गोटे उभे आहेत, तर भाजपने अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे २०२४ च्या निवडणुकीतही शाह फारुक अनवर यांना विजय मिळतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.