धुळे – संभाव्य बाल विवाहांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे मुलींचा मागोवा घ्या या उपक्रमातंर्गत ॲप तयार करण्यात आले आहे. यात पाचवीपासून पुढील वर्गातील सर्व मुलींचा नियमित मागोवा घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा >>> नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम; शिंदे गट – अजित पवार गटात संघर्ष
जिल्हा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ यांच्या वतीने जिल्ह्यात दोन वर्षांपासून बालविवाह निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेत एकदिवसीय ५१ चॅम्पियन्सचे प्रशिक्षण झाले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता प्रमुख पाहुणे होते. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी आदी यावेळी उपस्थित होते