Dindori महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत दिंडोरीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार होतं. एक्झिट पोल्स हे महायुतीच्या बाजूने आहेत असं एक्झिट पोल्स सांगत होते. निवडणूक निकालांमध्ये घडलंही तसंच. दिंडोरीची निवडणूक नरहरी झिरवाळ यांनी ४४ हजारांहून अधिक मतांनी जिंकली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ – १२२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिंडोरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. दिंडोरी हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी सिताराम झिरवाळ हे दिंडोरी ( Dindori ) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धनराज महाले यांची बंडखोरी झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा