नाशिक : उद्योग सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे अद्यापही फरार आहे. दुसऱ्या संशयित नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक (अतिरिक्त कार्यभार) आरती आळे यांना बाळ असल्याने त्यांनाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योग सुरू करण्यासाठी तक्रारदाराला पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. यासाठी त्याने येथील पुरातत्व विभागाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी सहायक संचालक आरती आळे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली. आळे या प्रसुतीरजेवर असल्याने निवासस्थानी त्यांना लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. आळे यांचे घर भाडेतत्वावर असून त्यांचे मूळ मालक तेजस गर्गे यांचे वडील मदन गर्गे आहेत. या प्रकरणात पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांचाही सहभाग उघड झाला. याप्रकरणी आळे आणि गर्गे यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…महायुती-मविआ यांच्यात सिडकोत संघर्ष, मुकेश शहाणेविरुध्द गुन्हा

बाळ असल्याने आळेंना अटक करण्यात आली नाही. त्यांना नोटीस देण्यात आली असून गरजेनुसार तपासाला बोलाविले जाणार आहे. दुसरीकडे, गर्गे फरार असून त्यांनी आपला भ्रमणध्वनी बंद ठेवला आहे. मुंबई येथील त्यांची मालमत्ता (घर) गोठविण्यात आली आहे. गर्गे यांचा पोलीस पथके शोध घेत आहेत. त्यांच्या मालमत्तेची माहिती जमा करणे सुरू आहे.

हेही वाचा…नाशिकमध्ये पावसाने ५१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

आळे यांना न्यायालयात हजर करणार

पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे हा प्रकार घडल्यानंतर फरार आहे. गर्गे यांच्या कुटूंबातील सदस्यांना बोलावून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आळे यांना बाळ असल्याने अद्याप त्यांना अटक नाही. आरोपपत्रासह त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. – नरेंद्र पवार (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director of directorate of archeology tejas garge accused of bribery yet abscond assistant director not arrested due to maternity leave psg
Show comments