आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कामांच्या प्रात्यक्षिकासह बाळगावयाची सावधानता याविषयी पुणे विद्यार्थी कल्याण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या नाशिकरोड संकुलाचे अध्यक्ष वसंतराव जोशी यांच्या उपस्थितीत झाले. प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या उपसंचालक उज्ज्वला बनकर, प्राचार्य डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनी मार्गदर्शन केले. डॉ. समीर लिंबारे यांनी परिचय करून दिला. विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. डॉ. सुषमा हसबनीस यांनी आभार मानले. पहिल्या सत्रात नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक किसन सांगळे यांनी आपत्ती व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात साहाय्यक उपनियंत्रक अतुल जगताप यांनी मार्गदर्शन केले. संतोष वाबळे यांनी रॅपलिंगचे प्रात्यक्षिक दाखविले.
‘आग व आगीचे प्रकार’ या विषयावर श्रीकृष्ण देशपांडे, तर मोनाली देशपांडे यांनी बँडेज व बँडेजचे प्रकार या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उपमुख्य क्षेत्ररक्षक प्रा. योगेंद्र पाटील यांनी ‘आपत्कालीन परिस्थितीत विविध गाठींचा उपयोग’ याबाबत, तर कमांडर राजेश्री कोरी यांनी नौदलात स्त्रियांचे करिअर, संधी व आव्हाने’ या विषयावर माहिती दिली.

Story img Loader