नंदुरबार – आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुन्हा एका क्षमता चाचणीला बसण्याची संधी दिली जाणार आहे. परंतु, हे शिक्षक पुन्हा अनुपस्थित राहिल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विभागाने दर तीन महिन्यातून एकदा विद्यार्थी आणि शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिक्षकांचा जोरदार विरोध आहे. आश्रमशाळा शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे नुकत्याच झालेल्या चाचणीला केवळ १० टक्के शिक्षक उपस्थित होते. त्यामुळे मंत्री यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा >>>अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

मंत्री गावित यांनी गैरहजर शिक्षकांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संधी मिळूनही जर क्षमता चाचणीला शिक्षक अनुपस्थित राहिलेच तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे शिक्षक संघटना आणि आदिवासी विकास विभाग यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disciplinary action against ashram school teachers absent from competency test if absent again amy