लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नंदुरबार : कोलकाता येथील घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला असून नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी त्यावर आपल्यापरीने उपाय शोधला आहे. परिचारिकांच्या सुरक्षेसाठी त्यांना मिरचीपूड पाकिटांचे वाटप नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. कोणीही छेड काढल्यास मिरची पूडचा वापर करा, असा संदेश डॉ. लहाडे यांनी दिला.

कोलकाता येथे महिला डॉक्टरबरोबर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे मेणबत्ती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका, अधिपरिचारिका, महिला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात निघालेल्या या फेरीत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कोलकाता घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमात आपला अनोखा निषेध नोंदविण्यासाठी फेरीत उपस्थित परिचारिकांना मिरचीपूड पाकिटांचे वाटप करण्यात आले.

आणखी वाचा-मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?

स्वत: जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी परिचारिकांना या मिरचीपूड पाकिटांचे वाटप करत असे कृत्य जर आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात महिलांबरोबर करताना कोणी दिसले तर, मिरचीपूड आपल्या रक्षणासाठी त्याच्यावर फेकून आपला बचाव करा, (असा सल्ला त्यांनी उपस्थित परिचारिका आणि महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. समाजाकडून फार काही अपेक्षित नसून आम्हीदेखील आमचे रक्षण करु शकतो, इतकाच संदेश यातून द्यायचा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी नमूद केले. या फेरीत जिल्हा सामान्य रुग्णालय. वैद्यकीय महाविद्यालय. परिचारिका महाविद्यालयासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.