लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : लवकरच शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची नवलाई विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही असते. ही नवलाईची किनार अधिकच गहरी करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. नवोदितांचे स्वागत, पुस्तक वितरण आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शाळेचा पहिला दिवस गोड व्हावा, यासाठी प्रवेशोत्सव होत असतांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असतील असा दावा केला जात आहे.

Indian Education System , National Education Policy
पहिली बाजू : शिक्षण क्षेत्रातील महासत्ता होण्यासाठी…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
national library and maharashtra state sahitya sanskrit mandal organize balakumar sahitya sammelan on february 10
वांद्रे येथे पहिले बालकुमार साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला संमेलनाचे उद्घाटन
Preservation of rare books benefits literature lovers Pune Nagar Vachan Mandir
दुर्मीळ पुस्तकांच्या जतनाचा साहित्यप्रेमींना लाभ, पुणे नगर वाचन मंदिराचा उद्या वर्धापनदिन
national medical commission will form expert committee to improve and standardize PG courses
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार,राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून प्राध्यापकांना सहभागी होण्याचे आवाहन
Guidance for 10th-12th students State Board appoints counsellors
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती
satara zilla parishad teacher Balaji Jadhav
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची पाठ्यवृत्तीसाठी निवड… राज्यातून ठरले एकमेव…

नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ १५ जून रोजी होत आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या लक्षात राहण्यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पडावे, यासाठी शिक्षण विभागाकडून सोमवारपासून वेगवेगळ्या केंद्रावर पुस्तक वितरीत होण्यास सुरूवात झाली आहे. याविषयी प्रशासनाधिकारी एन. बी. पाटील यांनी माहिती दिली. शहर परिसरात मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती अशा वेगवेगळ्या माध्यमातील ३०४ शाळांमधील पहिली ते आठवीतील एक लाख, १४ हजार ८९५ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये, यासाठी सोमवारपासून गट केंद्रावर पुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-नाशिक : दोन मित्रांची रेल्वेखाली आत्महत्या

दुसरीकडे, गणवेश खरेदीबाबत निविदा पूर्ण केली असली तरी वरिष्ठ पातळीवरून अद्याप याविषयी काहीच सूचना नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहण्यासाठी कोणकोणत्या कल्पनांवर काम करता येईल, या अनुषंगाने १२ जून रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून नव्या वर्षाची सुरूवात अभिनव पद्धतीने कशी करता येईल, याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.

Story img Loader