जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयातील रेडिओ मनभावन ९०.८ एफएम या सामुदायिक रेडिओ केंद्राला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून चक्क आरजे म्हणून सूत्र सांभाळत उपस्थित विद्यार्थिनींची मुलाखत घेतली.  जळगाव जिल्हाधिकार्यांना यापूर्वी पत्रकार, आकाशवाणीत उद्घोषक, निवेदक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना कार्यक्रमात आरजे म्हणून सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. विशेष म्हणजे त्यांनी आरजेच्या खास शैलीत विद्यार्थिनींशी संवाद साधला. जिल्हाधिकार्यांना प्रशासनासह अनेक सामाजिक विषयांवर सहकार्यांनी बोलते केले. त्यांनीही अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. त्यांनी या केंद्रातील संपूर्ण कामकाजाची माहितीही जाणून घेतली.

  रेडिओ केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी, शिक्षक आणि समाजोपयोगी विविध उपक्रमांमुळे समाजातील अनेक घटकांना मनोरंजनासह ज्ञान, विज्ञान, माहिती, जनजागृती आदींबाबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या लाभ मिळत आहे. पुढेही या केंद्राच्या माध्यमातून चांगले समाजोपयोगी विषय सकारात्मकरीत्या जनतेपर्यंत पोहोचावेत, जळगावसह संपूर्ण खान्देशातील शैक्षणिक, साहित्य, धार्मिक, आध्यात्मिक माहिती, बोली, भाषा, खाद्यसंस्कृती, स्थानिक आदर्श रूढी, परंपरा, शासकीय योजना, विविध क्षेत्रांतील विकास, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे प्रसारण जास्तीत जास्त सकारात्मकरीत्या व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

renowned flautist pandit ronu majumdar creates guinness world record by performing at indian classical music event with 546 musicians
५४६ संगीतकारांचा सांगीतिक आविष्कार; ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
hmpv task force jj hospital dean dr pallavi saple
एचएमपीव्हीच्या प्रतिबंधासाठी कृती दलाची स्थापना, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
HMPV Nagpur , HMPV suspects Nagpur,
नागपुरातील ‘एचएमपीव्ही’ संशयितांची तपासणी लांबणीवर, एम्स रुग्णालय…
Viral Video Shows Neighbours daughter Love
शेजाऱ्यांचे प्रेम! चिमुकलीने रेखाटलं गोल्डीसाठी चित्र, मालक झाला खूश अन्…; पाहा Viral Video
वातावरणात ‘नाट्योत्सव’ रंगला; उरण येथील जेएनपीएच्या सभागृहात दर्जेदार लोकांकिकांचे सादरीकरण
Devendra Fadnavis Jiretop Video
VIDEO : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप घालण्यास दिला नकार; संत संवाद कार्यक्रमातील कृतीने वेधलं लक्ष!

हेही वाचा >>>नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात नव्याने २० चारचाकी वाहनांचा समावेश

 जिल्हाधिकार्यांनी विद्यार्थिनी अश्विनी राठोड व सुजाता धुरंदर यांची मुलाखत घेतली. यात स्थानिक प्रशासन, विद्यार्थिनी, पालक, कौटुंबिक, महिलांच्या अनेक विषयांवरील चर्चा रंगली. प्राचार्य एस. एन. भारंबे यांनीराबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी गायत्री पाटील, वैष्णवी पाटील, प्रियांका बारी, राहुल पाटील, साहिल गायकवाड, ज्ञानेश्वर वाघ उपस्थित होते.

Story img Loader