मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टिने आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावपातळीवर गर्भवतींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. पहिले अपत्य मुलगी असेल तर, अशा गर्भवतींचे समुपदेशन करण्यात यावे. तसेच सर्वेक्षण केलेल्या गर्भवतींच्या प्रसूतीविषयी सविस्तर माहिती घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केली आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी आणि राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम तसेच तंबाखु नियंत्रण कायदा अंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात महिला दिनानिमित्त ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, या अभियानाची जिल्ह्यात अंमलबजावणी करतांना आरोग्य विभागासह शिक्षण, महिला व बालविकास या विभागांचे सहकार्य घेण्यात यावे, समितीच्या अंतर्गत तसेच नोंदणी नसलेल्या सोनोग्राफी केंद्राची माहिती घेवून त्यांच्यावर देखील देखरेख ठेवण्यात यावी, जेणेकरून अनोंदणीकृत सोनोग्राफी केंद्राच्या माध्यमातून गर्भलिंग निदान होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत असल्याचे आढळून आल्यास त्या केंद्रावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

हेही वाचा >>> नाशिक : मुख्याध्यापिकेच्या मनमानी विरोधात विद्यार्थिनींचा १५ किमी मोर्चा, प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कार्यमुक्तीचा आदेश

बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व तंबाखु नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने वर्षभरात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना दिंडोरी, निफाड, चांदवड, पेठ, कळवण व सुरगाणा हे सहा तालुके तंबाखुमुक्त झाले असल्याचे सांगण्यात आले. एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील साधारण ५०० शाळांमध्ये तंबाखुमुक्त शालेय अभियान राबविण्यात आले असल्याचे सांगितले. यासोबतच पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची आणि लेक वाचवा, लेक वाढवा या अभियानाच्या जनजागृतीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी माहिती सादर केली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भागवत फुलारी, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या उज्ज्वला पाटील यांच्यासह ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.