लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव – केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत जमीन भाड्याने घेऊन त्यावर नियमित भाडे सुरू करण्याच्या मोबदल्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. देवराम लांडे (५२, शशिकलानगर, चाळीसगाव) असे लाच घेणाऱ्या अधिकार्‍याचे नाव आहे.

nashik east vidhan sabha
नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार
supriya sule
‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजपमध्ये दुफळी, सुप्रिया सुळे यांचा…
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
Former BJP MP from Dindori Constituency Harishchandra Chavan passed away
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

चाळीसगाव शहरातील ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. तक्रारदारांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेऊन त्यांना नियमित भाडे सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी लांडे यांनी २२ जूनला ५० हजारांची लाच मागितली होती. मात्र, लाचेचा सापळा आल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र, धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याचा अहवाल आला.

आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात महिनाभरात ४४ छापे; २२ ठिकाणी दुधात भेसळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, हवालदार सुधीर मोरे यांच्या पथकाने चाळीसगाव येथील शशिकलानगर भागातील निवासस्थानातून लांडे यांना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बेड्या ठोकल्या. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात लांडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.