लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव – केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत जमीन भाड्याने घेऊन त्यावर नियमित भाडे सुरू करण्याच्या मोबदल्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकार्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. देवराम लांडे (५२, शशिकलानगर, चाळीसगाव) असे लाच घेणाऱ्या अधिकार्याचे नाव आहे.
चाळीसगाव शहरातील ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी भाड्याने देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. तक्रारदारांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेऊन त्यांना नियमित भाडे सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी लांडे यांनी २२ जूनला ५० हजारांची लाच मागितली होती. मात्र, लाचेचा सापळा आल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र, धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याचा अहवाल आला.
आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात महिनाभरात ४४ छापे; २२ ठिकाणी दुधात भेसळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, हवालदार सुधीर मोरे यांच्या पथकाने चाळीसगाव येथील शशिकलानगर भागातील निवासस्थानातून लांडे यांना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बेड्या ठोकल्या. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात लांडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.