सात विशेष बालकांचाही समावेश
नाशिक : तीन वर्षांत जिल्ह्यातून १०० बालके देशात तसेच विदेशांत दत्तक गेली असून त्यात सात विशेष बालकांचा समावेश आहे. दोन दत्तक बालकांना नाकारल्याचे प्रकारही घडल्याचे येथील आधारआश्रमाचे समन्वयक राहुल जाधव यांनी सांगितले. दत्तक बालकांचे प्रश्न वेगळे असून त्यांचा विचार व्हायला हवा. दत्तक घेण्याकडे पालकांचा कल वाढत असला तरी त्यासाठी वेळ लागत असल्याने या प्रक्रि येला कु ठे तरी खीळ बसत असल्याचे त्यांनी मांडले.
संसारात गोंडस बाळ आल्यावर मिळणारा आनंद काही विशेष असतो. बदलती जीवनशैली, त्यामुळे जडणारे आजार यामुळे काही दाम्पत्यांची बाळ होण्याची इच्छा अपूर्ण राहते. ही इच्छा मूल दत्तक घेऊन पूर्ण के ली जाऊ शकते. त्यामुळे बहुतेक जण या प्रक्रि येचा अवलंब करतात.
संसार सुरू झाल्यावर अनेकांना गोड बातमी कधी देणार, अशी विचारणा आप्तेष्टांकडून होणे सुरू होते. बाळ होण्यासाठी आवश्यक सर्व उपाय करून थांबले की ही विचारणा अनेकांच्या जिव्हारी लागते. मग आय.व्ही.एफ., टेस्ट ट्यूब बेबी या प्रकारांकडे लक्ष देणे सुरू होते. त्यासाठी लागणारा खर्च सर्वांनाच परवडत नाही. महत्त्वाचे म्हणजे इतका खर्च करूनही प्रयोग यशस्वी होईलच, असे नाही. दुसरीकडे बहुतांश कु टुंबे छोटी झाली आहेत. जबाबदाऱ्या वाढल्याने आई-वडील होण्याची जबाबदारी, येणाऱ्या बाळाला द्यावा लागणारा वेळ देण्याची अनेकांची मानसिकता नसते. जीवनशैली बदलल्यामुळे कामाचा ताण, यामुळे येणारे नैराश्य पाहता महिला तसेच पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. अशा वेगवेगळ्या चक्रातून पार पडल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून काहींकडून दत्तक प्रक्रियेचा पर्याय निवडला जातो.
दत्तक प्रक्रि या किचकट असल्याने तिला वेळ लागतो. त्यामुळे काही तडजोड होते का, हे पाहण्याचा प्रकार दाम्पत्यांकडून होतो. त्यातूनच गैरप्रकार वाढीस लागतात. दत्तक प्रक्रि येच्या वेळी बऱ्याचदा वंशाला दिवा हवा म्हणून दाम्पत्ये मुलासाठी आग्रही असतात. संबंधित पालकांकडून बाळ गोरे हवे, व्यंग नको अशा अटी घातल्या जातात. वास्तविक निसर्गप्रक्रि येतून जन्माला येणाऱ्या बाळाविषयी पालकांच्या अपेक्षा नसतात. त्याला काही व्यंग असले तरी वैद्यकीय उपचारांनी ते बरे करण्याकडे कल असतो. अनाथ बालकांच्या बाबतीत वेगळा अनुभव येतो.
दत्तक प्रक्रि येत भारतात व्यंग असलेली बालके नाकारली गेली. जी बालके दत्तक गेली; ती सतत रडतात, चिडचिड करतात, अरेरावीने वागतात, अशी कारणे देत त्यांची रवानगी पुन्हा अनाथालयात करण्यात आली आहे.
दत्तक बालकांचा विचार व्हावा
आई-बाबा व्हायचे तर अपेक्षा का? निसर्गनियमाप्रमाणे बाळ जन्माला येत असताना आपण अटी घालत नाही. परंतु दत्तक बाळासाठी अटींची मालिका असते. दिवसाकाठी चार ते पाच कु टुंबे या प्रक्रि येविषयी विचारणा करतात. पण त्यातही मुलगा पाहिजे हा हट्ट. वेगवेगळ्या रुग्णालयांमधून बालकांसाठी विचारणा होत आहे. दत्तक प्रक्रि येसाठी कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करता साधारणत: दोन वर्षांचा कालावधी लागतो. यामुळे पालकांनी संयम ठेवणे गरजेचे आहे. – राहुल जाधव (समन्वयक, आधारआश्रम)