लोकसत्ता वार्ताहर

धुळे: दूध भेसळ रोखण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीने महिनाभरात ४४ ठिकाणी छापे टाकले. त्यापैकी २२ ठिकाणी दुधात भेसळ आढळली. पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील समित्यांनी केलेल्या कार्यवाहीचा नुकताच ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

यावेळी धुळे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी माहिती दिली. खासगी दूध डेअरी, दूध विक्री करणारे फेरीवाले, विक्रेते यांच्याकडील दुधाची तपासणी करण्यात आली.भेसळ आढळलेले जवळपास १५०० लिटर दूध समितीने जागीच नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… संसदेत मराठा आरक्षणावर भाजपचे खासदार गप्प; रोहित पवार यांची टीका

सणासुदीच्या काळात दूध भेसळ रोखण्याकरिता १५ सप्टेंबरपर्यंत प्रभावी मोहीम राबवून कुठल्याही प्रकारची दूध भेसळ करणाऱ्या,अवैध वजनमापे व तोलन काटे, खाद्य वस्तू विक्री परवाना, दुकान परवाना नसल्यास अशा आस्थापनेवर, दूध विक्रेत्यांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले. त्यानुसार १५ दिवसांत दूध भेसळ रोखण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत धडक कारवाई करण्यात येईल, असे केकाण आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले.

हेही वाचा… Brahmagiri Shravan Somwar: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी

ऑनलाइन बैठकीला जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, वैधमापन शास्त्र निरीक्षक संतोष दलाल, सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व्ही. व्ही. गरुड, दुग्धशाळा व्यवस्थापक सतिलाल बोरसे, प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, कृष्णा नेरकर उपस्थित होते.