जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीच्या गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे आणि त्यानंतर संघाच्या अध्यक्षांसह कार्यकारी संचालकांनी आधी दाखल केलेली तक्रार कमकुवत करण्यासाठी अर्थात आपले पाप लपविण्यासाठी ठिय्या आंदोलनाचा बनाव केल्याचा, तसेच आरोपीलाच फिर्यादी केल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला.

हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित होते. त्यांना भाजपतर्फे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेले दूध संघातील लोणी व दूध भुकटीतील गैरव्यवहारासंदर्भातील तक्रार अर्जाचे स्मरणपत्र देत त्यातील दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.पोलीस ठाणे आवारात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे विविध घोषणांचे फलक होते. या फलकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा : अखेर खडसेंचे ठिय्या आंदोलन स्थगित ; पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप

याप्रसंगी पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ज्येष्ठ पदाधिकारी कैलास सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, उज्ज्वला बेंडाळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, भाजपचे आमदार चव्हाण यांनी लोणी आणि दूध भुकटीच्या गैरव्यवहाराची पहिली तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अगोदर त्यासंदर्भात गुन्हा दाखल करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदनाद्वारे दिला. डॉ. मुंढे यांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊ. योग्य त्या कायदेशीर बाबी तपासल्या जातील. निष्पक्षपणे चौकशी केली जाईल. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्‍वासन दिले.

Story img Loader